GoshtiBishti
GoshtiBishti
GoshtiBishtiGoshtiBishti
तुला माहितीये त्या दिवशी काय झालं.. अस जरी कोणी म्हटलं तरी आपले कान उभे राहतात. कारण किस्से, गोष्टी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजीच्या राजा-राणीच्या गोष्टींपासुन मोठमोठ्या कादंबरीकारांच्या कल्पनाविस्तारात रमतोच आपण.. लिखाण दोन प्रकारचं असतं.. एक, जे आपण वाचु शकतो आणि स्वत:च्या वैचारीक कुवतीप्रमाणे रंजन करू शकतो.. दुसरे, कोणीतरी शब्दांना छान लयीत ऐकवुन.. डोळ्यासमोर चित्र उभा राहतील अशी अनुभूती देणारं...आम्ही दुसरा पर्याय निवडला... गोष्टी ऐकवण्याचा. इच्छा एकदम साधी... ऐकणाऱ्यानं जीवाचे कान केले की आपण शब्दांचा पसा त्याच्या झोळीत रिकामा करायचा. आता तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आहोत.