आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.