Lets Talk Sexuality
Sex Aani Barach KahiLets Talk Sexuality
लैंगिकता शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने letstalksexuality.com ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. याच वेबसाईटचा भाग म्हणून सेक्स अणि बरंच काही हे पॉडकास्ट निर्माण झालेले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातुन लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा, लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हे महत्वाचे उद्देश आहे. पॉडकास्टच्या माध्यमातुन होणा-या चर्चा व संवादामुळे लैंगिकता या विषयाबद्दल युवकांमध्ये निरोगी दृष्टीकोन निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे.ही वेबसाइट व पॉडकास्ट ‘तथापि ट्रस्ट – स्त्रिया आणि आरोग्य संसाधन केंद्राने’ तयार केली आहे. ना नफा या तत्वावर आम्ही हे काम करत आहोत.अधिक माहितीसाठी [email protected] किंवा [email protected] या मेलवर विचारणा करु शकता.लैंगिकता विषयाची मराठीत माहिती घेण्यासाठी letstalksexuality.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.तथापि ट्रस्ट च्या कामाबाबत अधिक माहितीसाठी www.tathapi.org इथे जरुर भेट द्या.